ETV Bharat / sports

भज्जीची नवी इनिंग, 'फ्रेंडशिप' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण - फ्रेंडशीप मुव्ही न्यूज

हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'फ्रेंडशिप' आहे. याचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सुर्या यांनी केले आहे. फिरकीपटू भज्जी या चित्रपटातून नविन इनिंगला सुरूवात करत आहे. भज्जीच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

harbhajan singh debut movie friendship release in august
भज्जीची नवी इनिंग, 'फ्रेंडशिप' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण; पाहा पोस्टर
author img

By

Published : Jun 6, 2020, 9:59 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. यात पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन याच्यासोबत स्वत: हरभजनही दिसत आहे. हरभजन लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या डेब्यू चित्रपटाचे हे पोस्टर आहे.

हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'फ्रेंडशिप' आहे. याचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सुर्या यांनी केले आहे. फिरकीपटू भज्जी या चित्रपटातून नविन इनिंगला सुरूवात करत आहे. भज्जीच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भज्जीने हा पोस्टर शेअर करताना, त्याला फ्रेंडशिप मुव्ही, असे कॅप्शन दिले आहे. यासोबत त्याने एक व्हीडिओ कॅमेरावाला आणि दुसरा चश्मा घातलेला स्माईली इमोजीही जोडला आहे.

दरम्यान, चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास पोस्टरमधून भज्जी काही विचार करत असल्याचे दिसून येत आहे. तर अॅक्शन किंग अर्जुन अग्रेसिव्ह लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

भज्जीने टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला आहे. तो मागील ४ वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवून शकला नाही. पण त्याची आयपीएलमधील कामगिरी भन्नाट ठरली आहे. तो आयपीएलच्या १३ हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. पण या स्पर्धेवर सद्य घडीला कोरोनाचे सावट आहे. यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - वर्णद्वेषाबाबत आयसीसीने व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली प्रतिक्रिया

हेही वाचा - जातीवाचक शेरेबाजी प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.