ETV Bharat / sports

#HappyBirthdayDhoni, धोनीचे काही अविस्मरणीय सामने - Jersey no 7

धोनीने अनेकवेळी भारतासाठी उत्तम फलंदाजी करत सामना खेचत आणला होता. असे काही अविस्मरणीय समान्यांवर त्याच्या वाढदिवसानिमित्त नजर टाकुयात.

MS Dhoni
महेंद्र सिंह धोनी
author img

By

Published : Jul 7, 2020, 6:16 AM IST

हैदराबाद - महेंद्र सिंह धोनीने भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. धोनीने भारतासाठी 15 वर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे सामने खेळले. तो एकेकाळी आईसीसी रँकिंगमध्ये काही वर्षांपर्यंत एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये सर्वोकृष्ट फलंदाजही होता.

धोनीला जागतिक क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. धोनीने अनेकवेळा भारतासाठी उत्तम फलंदाजी करत सामना खेचत आणला होता. असे काही सर्वश्रेष्ठ सामन्यांवर त्याच्या वाढदिवसानिमित्त नजर टाकुयात.

148 vs पाकिस्तान 2005

पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांतील असफलतेनंतर विशाखापट्टणम येथे पाकिस्तानच्या विरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यानंतर धोनीला खरी ओळख मिळाली. त्या सामन्यात धोनीने फक्त 123 चेंडूतं 15 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 148 धावांनी धमाकेदार फलंदाजी केली होती. धोनीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताने 50 षटकांत 9 गडी गमावत 356 धावा काढल्या आणि तो सामना 58 धावांनी आपल्या खिशात घातला होता.

183 v/s श्रीलंका 2005

2005 मध्येच जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळलेल्या सामन्यात धोनीने अपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा काढल्या होत्या. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकाने कुमार संगकाराच्या शतकी खेळीच्या जोरावर 298 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात धोनीच्या 145 चेंडूमध्ये 183 धावा नाबाद खेळीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. यावेळी धोनीने 15 चौकार आणि 10 षटकार खेचले होते.

139 v/s अफ्रीका XI, 2007

2007 मध्ये अशिया कडून खेळताना धोनीने 97 चेंडूत 139 धावांची तुफानी फलंदाजी करत आफ्रीका XI च्या गोलंदाजांना पळता भूई केले होते. या सामन्यात धोनीने 15 चौकार आणि पाच षटकार लावले होते. धोनीच्या फलंदाजीच्या जोरावर अफ्रीका XI ने हा सामना 13 धावांनी हारला होता.

91 vs श्रीलंका, 2011

विश्वचषक 2011 च्या शेवटच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका एकमेकांसमोर होते. श्रीलंकाने भारतसमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सचिन आणि सेहवागच्या बाद झाल्यानंतर भारतील संघावरचा दवाब वाढला होता. गौतम गंभीरच्या 97 धावांमुळे भारतीय संघांने मुसंडी मारली पण, फिनिशिंग टच धोनीने अपल्या धमाकेदार फलंदाजीतून दिला. धोनीने 79 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 91 धावांची नाबाद खेळी केली आणि विश्वचषक भारताच्या नावे केला. मुंबईच्या वानखेडे मध्ये ज्या प्रकारे धोनीने षटकार खेचला त्या प्रकारे भारताला वर्ल्ड चैम्पियन बनवले.

224 v/s ऑस्ट्रेलिया, 2013

2012-13 साली बॉर्डल-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात धोनीने चेन्नईतील एमए चिदम्बरम मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 265 चेंडूमध्ये 24 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने तुफानी फटकेबाजी करत अपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली द्विशतकी खेळी केली होती. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखत धुळ चारली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.