ETV Bharat / sports

''रोहित शर्माच सर्वोत्कृष्ट सलामीवीर'' - Hanuma Vihari latest news

मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीने रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय सलामीवीर म्हणून निवडले आहे. विहारीने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आवडता क्रिकेटपटू म्हटले आहे. तर, सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून वर्णन केले आहे.

Hanuma Vihari chose Rohit as the best ODI opener
''रोहित शर्माच सर्वोत्कृष्ट सलामीवीर''
author img

By

Published : Apr 6, 2020, 9:18 PM IST

नवी दिल्ली - भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीने रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय सलामीवीर म्हणून निवडले आहे. विहारीच्या एका चाहत्याने विचारले की, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यापैकी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीर कोण? त्याला उत्तर म्हणून विहारीने रोहित शर्माची निवड केली.

विहारीने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आवडता क्रिकेटपटू म्हटले आहे. तर, सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून वर्णन केले आहे.

विहारीपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांना टी -20 क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज म्हणून वर्णन केले होते.

कोरोना व्हायरसमुळे बहुतेक देशातील क्रिकेटपटू सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यावेळी ते लोकांना आपल्या घरातच रहाण्याचे आवाहनही करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.