ETV Bharat / sports

खेळाडूंचा भन्नाट डान्स, पण टोपी घातलेला चौथा कोण? व्हिडिओ पाहा अन् ओळखा - ind vs nz

चहलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे दिसून येत आहेत. हे सगळे जण डान्स करताना पाहायला मिळत असून चहलने, या व्हिडिओला मैदानाबाहेरही आमचा चांगला परफॉरमन्स, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

Guess The Mystery Man In Yuzvendra Chahal's Tik Tok Dance Video
खेळाडूंचा भन्नाट डान्स, पण टोपी घातलेला चौथा कोण? व्हिडिओ पाहा अन् ओळखा
author img

By

Published : Feb 1, 2020, 5:35 PM IST

वेलिंग्टन - भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरच्या थरारात बाजी मारली. भारतीय संघ ५ टी-२० सामन्याच्या मालिकेत ४-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघ अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडला 'क्लिन स्वीप' देण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत. युझवेंद्र चहलने आपल्या साथीदारासह मस्ती करतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

चहलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे दिसून येत आहेत. हे सगळे जण डान्स करताना पाहायला मिळत असून चहलने, या व्हिडिओला मैदानाबाहेरही आमचा चांगला परफॉरमन्स, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये अय्यर, चहल आणि दुबे यांच्यासह आणखी एक खेळाडू दिसून येत आहे. पण तो टोपी घालून खाली पाहत असल्याने, त्याला ओळखणे कठिण आहे.

चहलने व्हिडिओ शेअर केल्यानंतर, तो चौथा कोण ? याविषयी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही लोकांनी तो रोहित शर्मा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काहींच्या मते, तो ऋषभ पंत आहे. काहींनी तर तो कुलदीप यादव किंवा केदार जाधव असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तो चौथा कोण आहे, याचा खुलासा चहलने केलेला नाही.

हेही वाचा - तिरंगी मालिकेत भारताचा पहिला विजय, इंग्लंडला केले पराभूत

हेही वाचा - IND VS NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या 'आऊट'

Intro:Body:

marathi sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.