जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ लकरच आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. स्मिथ लवकरच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक म्हणून काम पाहणार आहे. शनिवारी झालेल्या बोर्ड बैठकीनंतर अध्यक्ष ख्रिस नेनजानी यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - INDvsWI 2nd T-20 : टीम इंडियासमोर मालिका विजयाचे ध्येय
'मला हे सांगताना आनंद होतोय, की आम्ही स्मिथला बोर्डाचा संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कराराशी संबंधित सर्व अटींवरील वाटाघाटी पुढील बुधवारपर्यंत पूर्ण होतील', असे नेनजानी यांनी म्हटले आहे. स्मिथला हा करार मान्य असेल तर तो इंग्लंडच्या देशांतर्गत दौऱ्यापूर्वी संघासमवेत असेल. तथापि, या मालिकेपूर्वी प्रशिक्षक आणि नवीन कोचिंग स्टाफ यांची नेमणूक करणे हेदेखील एक मोठे आव्हान स्मिथपुढे असणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. काही दिवसांपूर्वी मंडळाचे मुख्य कार्यकारी थंबाग मोरो यांना गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टोनी आयरिश यांच्या मागणीवरून अध्यक्ष नेनजानी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजीनामा देण्यास नकार दिला आहे.