कॅनडा - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू, सिक्स किंग युवराज सिंह याने कॅनडामधील ग्लोबल टी-२० सामन्यात खेळताना तुफानी फटकेबाजी केली. युवराजने २२ चेंडूत ५१ धावा चोपल्या. त्याने ही खेळी तीन चौकार आणि पाच उत्तुंग षटकाराच्या मदतीने साकारली.
टोरॅटो नॅशनल्स आणि ब्रेम्पटन वुल्व्स यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यामध्ये ब्रेम्पटन वुल्व्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद २२२ धावा केल्या होत्या. २२३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टोरॅटो नॅशनल्स संघाचा कर्णधार युवराज सिंह याने तुफानी खेळी केली. मात्र युवीच्या खेळीनंतरही टोरँटो नँशनल्स संघ निर्धारीत २० षटकात २११ धावा करु शकला आणि टोरँटो संघाला ११ धावांनी पराभूत व्हावे लागले.
दरम्यान, युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो सद्या इतर टी-२० लीग खेळत आहे.