मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत साखरपुडा केला. महत्वाचे म्हणजे, हा मॅक्सवेलचा विनीसोबतचा दुसरा साखरपुडा ठरला. गेल्या महिन्याच्या २७ तारखेला मॅक्सवेलने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, साखरपुडा केला होता. आता त्यानं भारतीय पद्धतीने विनीसोबत पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विनीने या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मॅक्सवेल निळ्या रंगाचा कुर्ता तर विनीने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. मॅक्सवेलचा हा देसी अवतार भारतीय चाहत्यांना चांगला आवडला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत. फेब्रुवारी महिन्यात मॅक्सवेलने इंस्टाग्रामवर विनी सोबत विवाह करणार असल्याचे सांगितले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, मानसिक आरोग्य ठीक नसल्याने मॅक्सवेलने वर्षभर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
- View this post on Instagram
Missing this angel of mine @gmaxi_32 💜 bring on summer & date nights 🌞 #throwback
">
हेही वाचा - खळबळजनक..! दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू जिल्हा रुग्णालयातून पळाले...
हेही वाचा - 'रोहित एकमेव फलंदाज ..जो टी-२० क्रिकेटमध्ये करू शकतो द्विशतक'