लंडन - ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटपटू मार्नस लाबुशेनने इंग्लंडचा काऊंटी क्रिकेट क्लब ग्लॅमरगॉनबरोबरचा करार 2022 पर्यंत वाढवला आहे. लाबुशेनने यापूर्वी क्लबशी दोन वर्षांचा करार केला होता, परंतु कोरोनामुळे काऊंटीचा हंगाम पुढे ढकलला गेला आहे.
हा करार वाढवल्यानंतर लाबुशेन म्हणाला, "करारातील एक वर्षाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेणे सोपे होते. मी 2020 च्या मोसमात ग्लॅमरगॉनला जात नव्हतो. क्लबबरोबर माझे पहिले वर्ष खूप चांगले होते आणि म्हणूनच मी पुढच्या काळात असणार आहे. क्लबबरोबर करार केल्याबद्दल मला आनंद झाला आहे. "
-
BBC Sport - Marnus Labuschagne: Australia batsman signs for extra year with Glamorgan https://t.co/BpClSHbuhf
— Alan Wilkins (@alanwilkins22) June 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BBC Sport - Marnus Labuschagne: Australia batsman signs for extra year with Glamorgan https://t.co/BpClSHbuhf
— Alan Wilkins (@alanwilkins22) June 19, 2020BBC Sport - Marnus Labuschagne: Australia batsman signs for extra year with Glamorgan https://t.co/BpClSHbuhf
— Alan Wilkins (@alanwilkins22) June 19, 2020
2019 मध्ये, लाबुशेननने काऊंटी चॅम्पियनशिपसाठी 1114 धावा केल्या. त्यामध्ये पाच शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. यावेळी, त्याची सरासरी 65 होती. काऊंटी क्रिकेटचे संचालक मार्क वॅलेस म्हणाले की, "क्लबशी करार करण्यामध्ये लाबुशेनने कोणताही संकोच केला नाही. त्याला क्रिकेट खेळणे आवडते. तो संघात चैतन्य आणतो."