नवी दिल्ली - पाकिस्तान विरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणारा भारताचा माजी डावखुरा फलंदाज आणि भाजपचे विद्यमान गौतम गंभीर आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मृत्यूशी झुंज देत असलेल्या पाकिस्तानच्या एका चिमुकलीची मदत केली आहे.
पाकिस्तानची ओमैमा अली ही चिमुकलीला ह्रदय विकाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अली कुटुंबीयांना तिचे उपचार भारतामध्ये करावयाचे आहे. मात्र, अली कुटुंबीयांकडे भारतीय व्हिसा नव्हता. याकारणाने ओमैमा उपचारासाठी भारतात येऊ शकत नव्हती. तेव्हा गंभीर अली कुटुंबीयांच्या मदतीला सरसावला.
त्याने विदेश मंत्री एस. जयशंकर यांना अली कुटुंबीयांना भारतीय व्हिसा मिळवून द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा शेवटी अली कुटुंबीयांना व्हिसा देण्यात आला. आता अली कुटुंबीय ओमैमाच्या उपचारासाठी भारतात येणार आहे. महत्वाचे म्हणजे गंभीरने जयशंकर यांच्यासह गंभीरने भारतीय भारतीय दूतावासकडेही व्हिसाची मागणी केली होती.
अखेर अली कुटुंबीयांना व्हिसा देण्यात आल्यानंतर गंभीरने एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, गंभीर हा नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर जागरुक असतो. त्याची दर्यादिली अनेकवेळा पाहायला मिळाली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं, पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या १०० मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा - विराट कोहलीला व्हायचंय शिवरायांसमोर नतमस्तक..! रायगड पाहण्याची आहे इच्छा
हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन