ETV Bharat / sports

Aus vs Ind : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी गंभीरने दिला कर्णधार रहाणेला मोलाचा सल्ला; म्हणाला... - भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी न्यूज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला पाहिजे. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं, असे गौतम गंभीरने सांगितले.

gautam gambhir gives such important advice to ajinkya rahane before 2nd test
Aus vs Ind : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी गंभीरने दिला कर्णधार रहाणेला मोलाचा सल्ला; म्हणाला...
author img

By

Published : Dec 23, 2020, 3:48 PM IST

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. अशात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्याने, तो भारतात परतला आहे. भारतीय संघ यामुळे अडचणीत आला आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने, भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला दिला आहे.

एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला पाहिजे. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं.'

अजिंक्य रहाणे आता विराटच्या जागेवर संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला मी विराटच्या जागेवर म्हणजे चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करताना पाहू इच्छितो. मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघात लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि शुबमल गिल या तिघांना अंतिम संघात स्थान मिळायला हवे, असे देखील गंभीरने सांगितलं.

राहुल पाचव्या तर पंतने सहाव्या स्थानावर फलंदाजी करायला हवी. यानंतर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा नंबर येईल. मला वाटत की, भारतीय संघात पाच गोलंदाज हवे, असे देखील गंभीरने सुचवले आहे.

टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना (दिवस रात्र) अ‌ॅडलेडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पहिल्या सामन्यात फलंदाजांची हाराकिरी -

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला कशीबशी २४४ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावा करू शकला. पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात भारतीय धुरंदर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर ढेर झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

हेही वाचा - IND Vs AUS : टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न सुटला; गिलला संधी मिळण्याचे संकेत

हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.