ETV Bharat / sports

....म्हणून विंडीजच्या दिग्गज कर्णधाराने '८३'चे शूटिंग पाहण्यास दिला नकार - kabir khan on clive lloyd wound news

भारतीय क्रिकेट संघाच्या या गौरवगाथेवर बालिवूड चित्रपट निर्माता कबीर खान 83 नावाचा चित्रपट बनवत आहे. यामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शनासाठी पुढे ढकलला गेला असला तरी चित्रपटाची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, कबीर खान आणि बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या संवादादरम्यान चित्रपटाविषयीच्या बर्‍याच मजेदार गोष्टी समोर आणल्या आहेत.

former windies captain clive lloyd has deep wound in his heart of 1983 wc defeat
....म्हणून विंडीजच्या दिग्गज कर्णधाराने '८३'चे शूटिंग पाहण्यास दिला नकार
author img

By

Published : Apr 22, 2020, 10:12 PM IST

Updated : Apr 22, 2020, 10:42 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट इतिहासात 1983 मधील विश्वकरंडक स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या विंडीज संघाला पराभवाचे पाणी पाजून भारताने विश्वकरंडक उंचावला होता. कपिल देवच्या नेतृत्त्वात खेळलेल्या भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती. मात्र, उपविजेत्या विंडीज संघाचे कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांना हा पराभव अजूनही पचवता आलेला नाही. 37 वर्षानंतरही लॉईड यांच्या मनात हा पराभव खोलवर रूजल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या या गौरवगाथेवर बालिवूड चित्रपट निर्माता कबीर खान 83 नावाचा चित्रपट बनवत आहे. यामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शनासाठी पुढे ढकलला गेला असला तरी चित्रपटाची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, कबीर खान आणि बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या संवादादरम्यान चित्रपटाविषयीच्या बर्‍याच मजेदार गोष्टी समोर आणल्या आहेत.

या संवादामध्ये कबीर खानने चाहत्यांना सांगितले, की लंडनमधील चित्रीकरणादरम्यान क्लाईव्ह लॉईडही सेटवर हजर होते. या चित्रपटात लॉईड यांच्या मुलाने क्लाईव्ह यांची भूमिका साकारली आहे. क्लायमॅक्स अधिक चांगला करण्यासाठी कबीर खानने लॉईड यांना शेवटचा सीन जवळून पाहण्यास सांगितला होता. परंतु लॉईड यांनी कबीर खानच्या सूचनेला नाकारत अतिशय मजेदार पद्धतीने उत्तर दिले.

लॉईड म्हणाले, ''तुम्ही मला दुसऱ्यांदा आणि फार जवळून वर्ल्डकप दूर जाताना पाहायला सांगत आहात.'' लॉई़ड यांचे उत्तर थट्टा-मस्करीच्या स्वरूपात असले तरी त्यांची वेदना जाणवत असल्याचे कबीर खानने सांगितले आहे. त्यामुळे लॉईड यांनी क्लायमॅक्सचे चित्रीकरण पाहण्यास नकार दिला.

कबीर खानने या चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले, की माल्कम मार्शलचा मुलगा मालीने त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. दिलीप वेंगसरकरची भूमिका साकारत असलेल्या आदिनाथ कोठारेसमोर गोलंदाजी करताना त्याने आदिनाथला जवळपास जखमी केले होते. विशेष म्हणजे, खऱ्या सामन्यातही मार्शलने वेंगसरकर यांना दुखापत केली होती. त्यामुळे ते अंतिम सामन्यात खेळू शकले नाही.

Last Updated : Apr 22, 2020, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.