कराची - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. जगभरात या विषाणूमुळे १३ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. याचा पाकिस्तानमध्येही प्रसार झाला आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूची भीती आता पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज दानिश कनेरियालाही वाटू लागली आहे. त्याने थेट प्रभू श्रीरामाकडे साकडं घातलं आहे. तसेच तो माता राणीकडे धावा करत आहे.
-
I hope you all are safe. Mata Rani kripa kare aap sab par. #CoronavirusPandemic
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I hope you all are safe. Mata Rani kripa kare aap sab par. #CoronavirusPandemic
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 22, 2020I hope you all are safe. Mata Rani kripa kare aap sab par. #CoronavirusPandemic
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 22, 2020
दानिश कनेरियाने ट्विट केलं असून त्यात तो कोरोनाच्या भीतीने प्रभू श्रीरामाकडे धावा करताना दिसत आहे. दानिश म्हणतो की, 'प्रभू श्रीराम, सगळ्यांना चांगलं आरोग्य देवो. मी कोरोना विषाणूपासून सर्वाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.'
-
May Prabhu Sri Ram bless you all with good health. I pray for the safety of all from #CoronaCrisis
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">May Prabhu Sri Ram bless you all with good health. I pray for the safety of all from #CoronaCrisis
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 20, 2020May Prabhu Sri Ram bless you all with good health. I pray for the safety of all from #CoronaCrisis
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 20, 2020
दानिश हा पाकिस्तान संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकमध्ये कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.
हेही वाचा - 'अरे.. कोरोनाला गांभीर्याने घ्या, अन् खबरदारी बाळगा'
हेही वाचा - कोरोनाची धास्ती : सिंधू, गोपीचंद होम क्वारंटाइनमध्ये...