कराची - इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तान संघावर संताप व्यक्त केला आहे. अक्रमच्या संतापण्याचे कारण हे हसण्यासारखंच आहे. त्याचे झाले असे की, पाक संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंच्या डाएट प्लानमध्ये बिर्यानीचा समावेश केला आहे. त्यानंतर अक्रमने पाक संघावर आणि व्यवस्थापनावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
-
Wasim Akram "Pakistani players are still being served biryani and you cannot compete against champions by feeding them biryani" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wasim Akram "Pakistani players are still being served biryani and you cannot compete against champions by feeding them biryani" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 7, 2019Wasim Akram "Pakistani players are still being served biryani and you cannot compete against champions by feeding them biryani" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 7, 2019
अक्रम म्हणाला की, 'बिर्यानी खाऊन तुम्ही विश्वकरंडक जिंकणार आहात का..? विश्वकरंडक स्पर्धेत क्रिकेट जगतातील दिग्गज संघाचा बिर्यानी खाऊन तुम्ही सामना नाही करु शकत.' अशा शब्दात अक्रमने पाक संघाचा समाचार घेतला.
विश्वकरंडक स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी पाकिस्तानने 5 एप्रिलला संभाव्य 23 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या संभावित खेळाडूंना 15 आणि 16 एप्रिलला लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणी देणे आवश्यक आहे. यानंतर 18 एप्रिलला विश्वकरंडकासाठीचा अंतिम संघ घोषित केला जाणार आहे.