मुंबई - माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पीलू रिपोर्टर यांना भारतीय क्रिकेटमधील सेवांबद्दल क्रिकेटर्स फाऊंडेशनने सन्मानित केले. रिपोर्टर यांनी २८ वर्षांच्या कारकीर्दीत १४ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. या सेवेसाठी ८२ वर्षीय रिपोर्टर यांचा ७५,००० रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
१९८६मध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी रिपोर्टर आणि भारतीय पंच व्ही. के. रामास्वामी यांना पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेसाठी आमंत्रित केले होते. या सामन्याद्वारे रिपोर्टर-रामास्वामी ही जगातील तटस्थ पंचांची पहिली जोडी बनली होती.
हेही वाचा - कर्णधार जो रूटचा इंग्लंडसाठी भीमपराक्रम
क्रिकेटर्स फाउंडेशनने मुंबई क्रिकेटशी संबंधित अनेक असंघटित नायकांना मदत केली आहे. या कालावधीत पंच अलीम दार यांनीही एक विशेष कामगिरी केली आहे. दार आपल्या घरी पहिल्या कसोटी सामन्यात पंचगिरी करणार आहेत. ऑन फिल्ड पंच म्हणून एहसान रझा आणि सामनाधिकारी म्हणून मोहम्मद जावेद मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वतीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहेत.
२००३मध्ये ढाका येथील पदार्पणानंतर एलिट पॅनेलचे सदस्य असलेल्या अलीम दार यांनी विक्रमी १३२ कसोटी सामन्यांत पंचगिरी केली आहे. तर आंतरराष्ट्रीय पॅनेलच्या एहसान यांनी आतापर्यंत ३७ एकदिवसीय आणि ५७ टी-२० सामन्यांमध्ये काम पाहिले आहे. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलचे सदस्य जावेद मलिक यांनी १० एकदिवसीय आणि ६ टी-२० सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम पाहिले आहे.