नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांना आता अतिदक्षता विभागातून (आयसीयू) एका खासगी खोलीत हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी बेदींवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली.
७४ वर्षीय माजी फिरकीपटू बेदी यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले, "काल बेदींना एका खासगी खोलीत पाठविण्यात आले आहे. आता त्यांची तब्येत सुधारत आहे. डॉक्टर आणखी काही दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवतील."
गेल्या महिन्यात बेदींवर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर, आता त्यांची ही दुसरी शस्त्रक्रिया झाली आहे. बेदींनी भारताकडून ६७ कसोटी आणि १० एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे २६६ आणि ७ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - VIDEO : धोनी आयपीएल २०२१ च्या तयारीला लागला, असे झाले जंगी स्वागत