ETV Bharat / sports

'भारत-पाकिस्तान मालिका न होणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट'

एथर्टन म्हणाला, ''मला वाटते की भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा खेळण्याची शक्यता अगदी कमी आहे. हे दोन्ही संघ एकमेकांपासून फार दूर असून ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र, हे दोन संघ जर खेळले तर, कसोटी क्रिकेटला चालना मिळू शकते.

author img

By

Published : Aug 17, 2020, 3:20 PM IST

Former england captain michael atherton's reaction on India-pakistan cricket series
''भारत-पाकिस्तान मालिका न होणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट''

साऊथम्प्टन - भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका होण्याची शक्यता कमी असून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल एथर्टन याने म्हटले आहे. आयसीसीच्या सर्व बहु-देशीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध खेळतात. परंतू, २०१२-१३ पासून दोन्ही संघांनी एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली नाही. २००७-०८ मध्ये पाकिस्तानने कसोटी मालिकेसाठी शेवटचा भारत दौरा केला होता.

एथर्टन म्हणाला, ''मला वाटते की भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा खेळण्याची शक्यता अगदी कमी आहे. हे दोन्ही संघ एकमेकांपासून फार दूर असून ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र, हे दोन संघ जर खेळले तर, कसोटी क्रिकेटला चालना मिळू शकते.

एथर्टन म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अविश्वसनीय असतो. आम्ही गेल्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेत ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामना पाहिला होता. मला वाटते, की या सामन्यासाठी ६ लाख लोकांचे अर्ज आले आणि २५ हजार तिकिटे विकली गेली."

जेव्हा भारताची इच्छा असेल तेव्हा द्विपक्षीय मालिका खेळण्यास पाकिस्तान तयार आहे, पण त्यासाठी आम्ही भारताच्या मागे धावणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.