ETV Bharat / sports

भारताच्या अजून एका माजी क्रिकेटपटूचे निधन, कुंबळेने वाहिली श्रद्धांजली

माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि बीसीसीआयचे क्युरेटर म्हणून कस्तुरीरंगन यांची ओळख होती. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज अशी ओळख असलेले कस्तुरीरंगन हे १९४८ ते १९६३ दरम्यान रणजी करंडक स्पर्धेत म्हैसूरकडून खेळले. त्यांन म्हैसूरकडून ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९४ बळी मिळवले. १९५२मध्ये भारतीय संघात वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी त्यांना निवडण्यात आले होते. पण त्यांनी या दौऱ्याला नकार दिला.

former cricketer gopalaswamy kasturirangan passes away
भारताच्या अजून एका माजी क्रिकेटपटूचे निधन, कुंबळेने वाहिली श्रद्धांजली
author img

By

Published : Aug 19, 2020, 5:20 PM IST

बंगळुरू - प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आता भारताने अजून एक महान क्रिकेटपटू गमावला आहे. माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे आज बुधवारी बंगळुरूतील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांचे चामराजापेट येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) कोषाध्यक्ष आणि प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी पीटीआयला सांगितले.

माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि बीसीसीआयचे क्युरेटर म्हणून कस्तुरीरंगन यांची ओळख होती. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज अशी ओळख असलेले कस्तुरीरंगन हे १९४८ ते १९६३ दरम्यान रणजी करंडक स्पर्धेत म्हैसूरकडून खेळले. त्यांन म्हैसूरकडून ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९४ बळी मिळवले. १९५२मध्ये भारतीय संघात वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी त्यांना निवडण्यात आले होते, पण त्यांनी या दौऱ्याला नकार दिला.

former cricketer gopalaswamy kasturirangan passes away
गोपालस्वामी कस्तुरीरंगन

कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शोक व्यक्त केला आहे. कुंबळे ट्विटरवर म्हणाला, ''कस्तुरीरंगन यांच्या मृत्यूची बातमी ऐकून वाईट वाटले. क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांची आठवण येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु: खात मी सहभागी आहे.''

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशननेही (KSCA) कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ''अध्यक्ष, सचिव आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, माजी रणजी खेळाडू, केएससीएचे उपाध्यक्ष आणि बीसीसीआय क्युरेटर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल असोसिएशन मनापासून खेद व्यक्त करते,”, असे KSCAच्या शोक संदेशात नमूद करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.