मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ग्रॅमी वॉटसन यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. ते ७५ वर्षाचे होते. मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असलेले वॉटसन हे १९६७ ते १९७२ या कालावधीत संघासाठी खेळले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी ५ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
-
Former Australian all-rounder Graeme Watson, who played five Tests and two ODIs for his country, died aged 75.
— ICC (@ICC) April 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ian Chappell paid tribute to his former team-mate: https://t.co/a2FJWG3Hvr pic.twitter.com/Iykerc1WoL
">Former Australian all-rounder Graeme Watson, who played five Tests and two ODIs for his country, died aged 75.
— ICC (@ICC) April 25, 2020
Ian Chappell paid tribute to his former team-mate: https://t.co/a2FJWG3Hvr pic.twitter.com/Iykerc1WoLFormer Australian all-rounder Graeme Watson, who played five Tests and two ODIs for his country, died aged 75.
— ICC (@ICC) April 25, 2020
Ian Chappell paid tribute to his former team-mate: https://t.co/a2FJWG3Hvr pic.twitter.com/Iykerc1WoL
वॉटसन यांना १९६६-६७ मध्ये आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बोलावणे आले. या मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत त्यांनी अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर मात्र, दुखापतीमुळे वॉटसन यांना संघाबाहेर बसवण्यात आले. त्यांनी १०७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये ४६७४ धावा केल्या असून १८६ विकेट्स घेतल्या आहेत.
१९७१-७२नंतर वॉटसन पश्चिम ऑस्ट्रेलियात गेले. तेथे त्यांनी शेफिल्ड शिल्डमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.