ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज माजी यष्टीरक्षकाचे निधन

1968 च्या अ‍ॅशेस दौर्‍यावर नियमित कर्णधार बिल लॉरी दुखापतग्रस्त झाल्यानंतर बॅरी यांनी एका सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले. हा सामना अनिर्णित राहिला आणि ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधारपद सांभाळणारे ते पाच यष्टीरक्षकांपैकी एक होते.

author img

By

Published : Jul 18, 2020, 1:06 PM IST

Former australian cricketer barry german dies
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज माजी यष्टीरक्षकाचे निधन

अ‍ॅडलेड - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बॅरी जर्मन यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. 1959 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी कानपूर येथे भारताविरुद्ध पदार्पण करणारे बॅरी संघात यष्टीरक्षक होते. त्यांनी 1969 पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एकूण 19 कसोटी सामने खेळले.

1968 च्या अ‍ॅशेस दौर्‍यावर नियमित कर्णधार बिल लॉरी दुखापतग्रस्त झाल्यानंतर बॅरी यांनी एका सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले. हा सामना अनिर्णित राहिला आणि ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधारपद सांभाळणारे ते पाच यष्टीरक्षकांपैकी एक होते.

"बॅरी जर्मन यांच्या निधनामुळे आम्ही मनापासून दु:खी आहोत. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा ते 33 वे कर्णधार होते. ते 84 वर्षांचे होते'', असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले. 1990 मध्ये आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तटस्थ मॅच रेफरीची नेमणूक केली, तेव्हा बॅरी पुन्हा एकदा चर्चेत आले.

1995 ते 2001 या काळात त्यांनी 25 कसोटी आणि 28 एकदिवसीय सामन्यात रेफरीची भूमिका साकारली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.