बारामती - बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पहिल्या रणजी सामन्याला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांच्यात हा सामना खेळला जात असून उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
-
बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020
ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकारातून बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी १९८५ मध्ये भव्य स्टेडियम उभारण्यास सुरुवात झाली होती. निधीअभावी तब्बल ३२ वर्षे या स्टेडियमचे काम रखडले होते. पुढे २०१५ मध्ये शरद पवार यांनी स्टेडियमची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून स्टेडियमचे उर्वरित काम पूर्ण करण्यात आले.
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते ६ एप्रिल २०१६ रोजी या स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांचीही उपस्थिती होती.
अशी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची रचना -
- मुख्य ग्राउंडचा परीघ - ४०० रनिंग मीटर
- मुख्य ग्राउंडचे एकूण क्षेत्रफळ - १२३०० चौरस मीटर
- मुख्य खेळपट्ट्या - ८ व सरावासाठी १४
- खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चेन लिंक फेन्सिंग
- प्रवेशद्वार - चार
- आसन क्षमता - ४३५०
अशी आहे खेळपट्टीची रचना -
- मैदानाच्या मध्यभागी २२ यार्ड लांबीच्या मुख्य आठ खेळपट्ट्या आहेत. खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग १० फूट रुंद आहे. आंतरराष्ट्रीय मैदानाच्या धर्तीवर मुख्य खेळपट्ट्यासह सराव खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत.
इतर सुविधा -
- खेळाडूंसाठी अत्यावश्यक जिम, चेंजिंग रूम, विश्रामगृह, कॅन्टीन अशा विविध सुविधा स्टेडियममध्ये आहेत.