नवी दिल्ली - 'ज्याप्रकारे २००२ च्या नेटवेस्ट ट्रॉफीमध्ये युवराज आणि मोहम्मद कैफ इंग्लंडविरूद्ध लढले होते, त्याचप्रमाणे देशाला कोरोनाशी झुंज द्यायची आहे', असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. जनता कर्फ्यूबद्दल बोलताना मोदी यांनी युवराज-कैफच्या नेटवेस्ट ट्रॉफीतील योगदानाला उजाळा दिला.
हेही वाचा - प्रसिद्ध फुटबॉलपटूला कोरोनाची लागण!
मोदींच्या संबोधनानंतर, माजी क्रिकेटपटू कैफने ट्विट करून लोकांना पंतप्रधानांच्या आज्ञांचे पालन करण्याचे आणि व्हायरस पसरण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. 'आता दुसर्या भागीदारीची वेळ आली आहे', असे कैफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले .
तर, कैफच्या ट्विटला उत्तर देताना मोदींनी लिहिले, 'असे दोन महान क्रिकेटर्स आहेत ज्यांचे योगदान विसरता येणार नाही. 'आणखी एक भागीदारी करण्याची वेळ आली आहे. यावेळी संपूर्ण भारत कोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात भाग घेईल', असे मोदींनी म्हटले आहे.
कैफ आणि युवराज यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या २००१ मधील नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १२१ धावांची भागिदारी रचत भारताला विजय मिळवून दिला होता.