लंडन - इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "खरे सांगायचे तर मला फक्त क्रिकेट खेळायचे आहे. मला असे वाटते की पुन्हा मैदानात परतण्याची भावना अद्भुत असेल. मला पुन्हा लहान मुलासारखे वाटत आहे",असे रॉय म्हणाला.
रॉय पुढे म्हणाला, "मला वाटते की आपण येथे सरकार चालवत आहोत. काय चालले आहे किंवा काय सुरक्षा उपाय आहेत हे आपल्याला खरोखर माहित नाही. प्रेक्षकांशिवाय खेळण्यातही मला आनंद आहे." ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप तयारीसाठीची वेळ उपलब्ध नसल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाईल, असा विश्वास 29 वर्षीय रॉयने व्यक्त केला आहे.
"जर खेळाडूंना तयारी करता येत नसेल आणि आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकलो नाही तर ही स्पर्धा पुढे ढकलणे योग्य ठरेल. परंतु वर्ल्डकप होईल तेव्हा क्रिकेट खेळणे आपले काम आहे. जर तयारीसाठी अजून तीन आठवडे शिल्लक राहिले तर आपण घरी तयारी करून खेळू", असे रॉय म्हणाला.