ETV Bharat / sports

धोनी अन् रोहित शर्माचे फॅन्स उसाच्या शेतात भिडले,  सेहवाग म्हणतो...

सद्या युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची उत्सुकता क्रिकेट चाहत्यामध्ये शिगेला पोहोचली आहे. अशात कोल्हापूरात आयपीएलच्या टीम चाहत्यांमध्ये धोनी आणि रोहित शर्मा यांच्यावरुन हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. पण या घटनेबद्दल दुजोरा मिळालेला नाही. उलट हे वृत्त चूकीचे असल्याचे कळते. या प्रकरणावर भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने आपले मत व्यक्त केले आहे.

Fans of MS Dhoni and Rohit Sharma clash; Virender Sehwag urges them to stay away from violence
धोनी-रोहित यांच्या चाहत्यांमध्ये 'राडा' नाहीच; सेहवाग म्हणतो... वाचा संपूर्ण प्रकरण...
author img

By

Published : Aug 23, 2020, 5:15 PM IST

मुंबई - क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच भारतात गल्लोगल्ली क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात. सद्या युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. अशात कोल्हापुरात आयपीएलच्या टीम चाहत्यांमध्ये धोनी आणि रोहित शर्मा यांच्यावरुन हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. पण या घटनेबद्दल दुजोरा मिळालेला नाही. उलट हे वृत्त चुकीचे असल्याचे कळते. या प्रकरणावर भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने आपले मत व्यक्त केले आहे.

काय आहे प्रकरण -

कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहरात फलक लावण्यावरुन रोहितच्या चाहत्यांनी धोनीच्या चाहत्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी ऊसाच्या शेतात नेऊन शिवीगाळ देणाऱ्यास मारहाण केली. असे वृत्त माध्यमांनी दिले. पण हे वृत्त निराधार असल्याचे समजते. या प्रकरणी त्या चाहत्यांनी धोनी व रोहित शर्मा यांचे फलक लावण्यासाठी नगरपालिकेतून रीतसर परवाना घेतला असल्याचे सांगत मारहाण प्रकरण घडलेच नाही, असे सांगितले आहे.

विरेंद्र सेहवागने या प्रकरणावर एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, क्या करते रहते हो पागलो... खेळाडू एकमेकांना आवडतात, फार तर जास्त बोलत नाहीत. आपल्या कामाशी काम ठेवतात. पण, काही फॅन्स वेडेच आहेत. भांडणं नका करू, भारतीय संघाला लक्षात ठेवा, असे म्हणत सेहवागने वाद न करण्याचे आवाहन केले आहे.

  • Kya karte rehte ho paagalon.
    Aapas mein players are either fond of each other or just don't talk much, kaam se kaam rakhte hain.
    But kuchh fans alag hi level ke pagle hain. Jhagda Jhagdi mat karo, Team India ko- as one yaad karo. pic.twitter.com/i2ZpcDVogE

    — Virender Sehwag (@virendersehwag) August 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ शुक्रवारी रात्री दुबईत दाखल झाला आहे. तर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही आपल्या संघासोबत दुबईला पोहोचला आहे. यंदा आयपीएलचा १३ हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

हेही वाचा - निवृत्ती घेतली अन पाच मिनिटांत धोनी भेटला 'या' माजी खेळाडूला...

हेही वाचा - इरफानने धोनीसह निवडला निवृत्तीच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूंचा संघ; विराटच्या संघाशी घ्यायचाय 'पंगा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.