ETV Bharat / sports

भारत अ आणि इंग्लंड लॉयन्स आज आमने-सामने, लोकेश राहुलवर साऱ्यांच्या नजरा - क्रिकेट

आवेशने स्थानिक सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. भारतीय खेळाडू सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी आशा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली आहे.

लोकेश राहुल
author img

By

Published : Feb 7, 2019, 3:06 PM IST

वायनाड - भारत अ संघ आणि इंग्लंड लॉयन्स यांच्यात पहिल्या ३ दिवसीय अनौपचारिक कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय कसोटी संघातील खेळाडू लोकेश राहुलवर साऱ्यांच्या नजरा आहेत. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज युवा आवेश खान आणि वरुण आरोन यांचादेखील संघात समावेश आहे. यांच्या कामगिरीवर निवड समितीची नजर असेल.

आवेशने स्थानिक सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. भारतीय खेळाडू सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी आशा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली आहे. अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात स्थानिक सामन्यात दमदार कामगिरी केलेले खेळाडू आहेत. दुसरीकडे लॉयन्सच्या संघाला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांचा ५ सामन्याच्या मालिकेत ४-१ असा पराभव झाला.

केरळचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेनाला रणजी चषकातील चांगल्या कामगिरीनंतर संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच सिद्धेश लाड, फिरकीपटू शाहबाज नदीम आणि मयंक मार्कंडेय यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या संघात कर्णधार सॅम बिलिंग्स चांगल्या फॉर्मात आहे. तसेच या संघात बेन डकेट आणि ओली पोप यांनादेखील संघात स्थान देण्यात आले आहे.

undefined

Intro:Body:

भारत अ आणि इंग्लंड लॉयन्स आज आमने-सामने, लोकेश राहुलवर साऱ्यांच्या नजरा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.