ETV Bharat / sports

रणजीचा 'सचिन'..! वसिम जाफरची क्रिकेटमधून निवृत्ती

author img

By

Published : Mar 7, 2020, 12:48 PM IST

Updated : Mar 7, 2020, 2:40 PM IST

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने आज (शनिवार) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वसिमने प्रथम श्रेणीमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

ex indian opener wasim jaffer announces retirement from all forms of cricket
रणजी 'स्टार' वसिम जाफरची निवृत्तीची घोषणा

मुंबई - भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने आज (शनिवार) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वसिमने प्रथम श्रेणीमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

जाफरला रणजीचा सचिन तेंडुलकर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम केला. तर जाफरने 'डोमेस्टिक क्रिकेट'मध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ४१ वर्षीय जाफर १५० रणजी सामने खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

निवृत्तीची घोषणा करताना जाफर म्हणाला, 'माझ्या वडिलांची इच्छा होती की मी भारतासाठी खेळावं. ती इच्छा मला पूर्ण करता आली याचा मला आनंद आहे.'

  • Batsman Wasim Jaffar announces retirement from all forms of cricket, says 'My father wanted one of his sons to represent India and I feel proud to have fulfilled his dream.' pic.twitter.com/8vQ7qe9qkw

    — ANI (@ANI) March 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जाफरने बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे संधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच त्याने सचिन तेंडुलकर राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटलं.

१० रणजी 'फायनल' खेळला, सर्वच्या सर्व जिंकला..!

वसिम जाफरने आपल्या कारकीर्दीत रणजीचे १० अंतिम सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आले आहे. त्याने २०१५-१६ पर्यंत मुंबईकडून खेळताना ८ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर दोन हंगामामध्ये त्याने विदर्भाकडून खेळताना संघाला विजय मिळवून दिला होता.

ex indian opener wasim jaffer announces retirement from all forms of cricket
वसिम जाफर

जाफरने १९९६-९७ या साली प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यात त्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. यामुळे त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाचा पहिला सामना २४ फेब्रुवारी २००० ला खेळला. २००८ पर्यंत त्याने एकूण ३१ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात त्याने ३४.१० च्या सरासरीने १९४४ धावा केल्या. यात ५ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

जाफरने २ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. यात त्याने एका डावात १० तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला होता.

हेही वाचा - पांड्याचा कहर सुरूच... एकाच सामन्यात ठोकले २० षटकार!

हेही वाचा - Women's T२० WC Final : पत्नीसाठी काय पण... 'त्याने' क्रिकेट दौरा सोडला अर्ध्यावर

Last Updated : Mar 7, 2020, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.