साऊथम्प्टन - एजेस बाउलवर आजपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेकू जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले. त्यामुळे कोरोनानंतर होणारे क्रिकेटचे पुनरागमन निर्धारित वेळेपेक्षा लांबले.
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी मालिकेतूव क्रिकेट परतणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना आज बुधवारपासून सुरू होत आहे.
तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल. याव्यतिरिक्त, आयसीसीनेही चेंडूला चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. ही दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब आहे. कारण जर पाहिले गेले तर इंग्लंडच्या परिस्थितीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे आणि दोन्ही संघांमध्येही चांगले वेगवान गोलंदाज आहेत.
संघ -
इंग्लंड प्लेईंग XI : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स, डोम बेस, जोस बटलर (यष्टीरक्षक), जॅक क्रॉले, जोए डेन्ले, ओली पोप, डोम सिब्ले, मार्क वुड.
वेस्ट इंडीज प्लेईंग XI : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेने ब्लॅकवुड, क्रेग ब्राथवेट, शारमहा ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, शेन डॉवरिच, शेनन गॅब्रिएल, शाई होप, अल्झारी जोसेफ, केमार रोच.