ETV Bharat / sports

साहेबांचा विंडीजवर पलटवार, दुसऱ्या कसोटीत मिळवला दमदार विजय - eng vs wi 2nd test result

वेस्ट इंडीजबरोबरच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. या विजयासह इंग्लडने 3 सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

England win 2nd test against West Indies in Old Trafford Manchester
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा वेस्ट इडिजवर विजय
author img

By

Published : Jul 20, 2020, 11:04 PM IST

मँचेस्टर - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात साहेबांनी ११३ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने आपला दुसरा डाव पाचव्या दिवशी 3 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावांवर घोषित केला. या डावात अष्टपैलू बेन स्टोक्सने 4 चौकार आणि 3 षटकारासंह 78 धावांची जलद खेळी केली. कर्णधार रूटनेही 22 धावांचे योगदान दिले. विंडीजकडून केमार रोचने 2 गडी बाद केले.

दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान संघाने शानदार गोलंदाजी करत विजय साकारला. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ३ तर स्टोक्स, बेस आणि वोक्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिज दुसरा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. विंडीजसाठी दुसऱ्या डावात ब्रुक्सने सर्वाधिक ६२ धावा तर ब्लॅकवूडने ५५ धावांची खेळी केली. विंडीज कर्णधार होल्डरने ३५ धावांची खेळी करत थोडाफार प्रतिकार केला मात्र तो बाद झाल्यावर विंडीजची घसरगुंडी झाली.

संक्षिप्त धावफलक -

नाणेफेक - वेस्ट इंडिज (गोलंदाजी)

इंग्लंड पहिला डाव - 9 बाद 469 डाव घोषित

वेस्ट इंडिज पहिला डाव - सर्वबाद 287

इंग्लंड दुसरा डाव - 3 बाद 129 डाव घोषित

वेस्ट इंडिज दुसरा डाव - १९८ सर्वबाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.