मँचेस्टर - वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी इंग्लंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात 226 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर विंडीजने 399 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 10 धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या डावात 62 धावा करणारा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विंडीज संघाच्या पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर दुसऱ्या डावातही त्याने 2 बळी आपल्या नावावर केले. खेळ थांबला तेव्हा क्रेग ब्रेथवेट आणि शाई होप खेळत होते.
सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज पाहता इंग्लंडने आपला दुसरा डाव 2 बाद 226 धावांवर घोषित केला. सलामीवीर रोरी बर्न्स (90) आणि डोम सिब्ले (56) यांनी पहिल्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी करुन इंग्लंडला दुसर्या डावात चांगली सुरुवात मिळवून दिली. यानंतर कर्णधार जो रूटने 56 चेंडूत नाबाद 68 धावांची तुफानी खेळी केली. त्याने बर्न्सबरोबर दुसर्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. बर्न्स बाद झाल्यावर रूटने डाव घोषित केला.
संक्षिप्त धाावफलक -
नाणेफेक - वेस्ट इंडिज (गोलंदाजी)
इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद 369
वेस्ट इंडिज पहिला डाव - सर्वबाद 197
इंग्लंड दुसरा डाव - 2 बाद 226 डाव घोषित
वेस्ट इंडिज दुसरा डाव - 2 बाद 10 (तिसऱ्या दिवसअखेर)