ETV Bharat / sports

इंग्लंडचा श्रीलंका दौरा आता 'या' महिन्यात होणार

''इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता पुढच्या वर्षी जानेवारीत होईल. यापूर्वी इंग्लंडच्या संघाने मार्चमध्ये श्रीलंकेला भेट दिली होती, परंतु कोरोनाच्या साथीमुळे हा दौरा पूर्ण होऊ शकला नाही", असे डी सिल्वा यांनी सांगितले.

author img

By

Published : May 2, 2020, 9:39 PM IST

England tour to sri lanka now in january said slc ceo
इंग्लंडचा श्रीलंका दौरा आता 'या' महिन्यात होणार

कोलंबो - इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता पुढच्या वर्षी जानेवारीत होईल, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटचे (एसएलसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अ‌ॅश्ले डी सिल्वा यांनी दिली. इग्लंडचा संघ यापूर्वी मार्चमध्ये श्रीलंका दौऱ्यावर आला होता. मात्र, कोरोनामुळे हा दौरा पूर्ण होऊ शकला नाही.

''इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता पुढच्या वर्षी जानेवारीत होईल. यापूर्वी इंग्लंडच्या संघाने मार्चमध्ये श्रीलंकेला भेट दिली होती, परंतु कोरोनाच्या साथीमुळे हा दौरा पूर्ण होऊ शकला नाही. आम्ही दौर्‍याच्या वेळापत्रकाचे पुढे ढकलण्यात आलेले काम पुन्हा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. इंग्लंडने पुढच्या वर्षी जानेवारीत हा दौरा आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत", असे डी सिल्वा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “कोणत्या दौऱ्याला कोणते वेळापत्रक निश्चित करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. आम्ही सर्व सामन्यांच्या पर्यायांवर विचार करत आहोत. आम्ही दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुन्हा निश्चित करण्याच्या विचारात आहोत. केव्हा करता येईल याबद्दल आम्ही चर्चा करत आहोत.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.