ETV Bharat / sports

स्टुअर्ट ब्रॉड ठरला 500 कसोटी बळींचा मानकरी - स्टुअर्ट ब्रॉड 500 कसोटी विकेट्स

ब्रॉडने कसोटी कारकिर्दीत 500 बळी घेण्याचा टप्पा पार केला. असा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. ब्रॉडच्या नावावर आता 140 कसोटी सामन्यामध्ये बळी जमा आहेत.

england pacer stuart broad takes 500 test wickets
स्टुअर्ट ब्रॉड ठरला 500 कसोटी बळींचा मानकरी
author img

By

Published : Jul 29, 2020, 12:52 PM IST

मँचेस्टर - वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत इंग्लंडने 269 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक ठरला वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 तर दुसऱ्या डावात 4 बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. या कामगिरीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

ब्रॉडने कसोटी कारकिर्दीत 500 बळी घेण्याचा टप्पा पार केला. असा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला. तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. ब्रॉडच्या नावावर आता 140 कसोटी सामन्यामध्ये बळी जमा आहेत.

तसेच इंग्लंडकडून कसोटीत 500 बळी घेणारा ब्रॉड जेम्स अँडरसन नंतरचा दुसराच गोलंदाज ठरला. सामन्याच्या पाचव्या दिवशी विंडीजच्या दुसर्‍या डावात क्रेग ब्रेथवेटला बाद करत ब्रॉडने हा कारनामा केला. विशेष म्हणजे जेम्स अँडरसननेही ब्रेथवेटलाच बाद करत 500 वा कसोटी बळी मिळवला होता.

या सामन्यात ब्रॉडने एकूण 10 गडी बाद केले. 2013 नंतर कसोटी सामन्यात त्याला प्रथमच 10 बळी मिळवण्यात यश आले आहे. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंड 30 जुलैपासून आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर इंग्लंड त्यांच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरूद्ध पुढील मालिका 5 ऑगस्टपासून खेळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.