मुंबई - इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला १४ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ईसीबीने याची घोषणा आज केली.
जेक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेविड मलान हे इंग्लंड टी-२० संघाचे सदस्य होते. आता एकदिवसीय स्वॉडमध्ये त्याचा समावेश अतिरिक्त खेळाडू म्हणून करण्यात आला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर एकदिवसीय मालिकेला मुकला आहे. त्याला कसोटी मालिकेदरम्यान, दुखापत झाली होती. तरीदेखील तो टी-२० मालिका खेळला होता. परंतु आता तो उपचारासाठी मायदेशी परतणार आहे.
दरम्यान, आर्चर आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सुरूवातीचे काही सामने मुकणार आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे.
उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. हे तीनही सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किंसंस, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड
हेही वाचा - Road Safety World Series : आज इंडिया-श्रीलंका लिजेंड्स यांच्यात 'महामुकाबला'
हेही वाचा - आयपीएलच्या १४व्या हंगामाआधी विराट कोहलीची मोठी घोषणा, म्हणाला...