मँचेस्टर - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन विंडीज दौऱ्यापूर्वी आजारी पडला आहे. एजेस बाऊल येथील एका खोलीत त्याने स्वत:ला सेल्फ आयसोलेट करून घेतले. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही माहिती दिली.
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी सॅमने नाबाद 15 धावा केल्या. या सामन्यानंतर रात्री त्याला ताप आणि अतिसाराचा त्रास झाला. "अष्टपैलू सॅम करनला रात्री ताप आणि अतिसाराचा त्रास झाला आहे. त्यानंतर दुपारपासून त्याला बरे वाटत आहे. संघाचे डॉक्टर त्याच्याकडे लक्ष ठेऊन आहेत. आज सकाळी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली", असे ईसीबीने सांगितले.
-
Jofra Archer vs Sam Curran in the nets at The Oval this morning 🔥
— Cricket District 🏏 (@cricketdistrict) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
[via @jofraarcher] pic.twitter.com/iHkz3PIXCf
">Jofra Archer vs Sam Curran in the nets at The Oval this morning 🔥
— Cricket District 🏏 (@cricketdistrict) June 10, 2020
[via @jofraarcher] pic.twitter.com/iHkz3PIXCfJofra Archer vs Sam Curran in the nets at The Oval this morning 🔥
— Cricket District 🏏 (@cricketdistrict) June 10, 2020
[via @jofraarcher] pic.twitter.com/iHkz3PIXCf
इंग्लंडचा 30 सदस्यीय संघ 23 जूनपासून एजेस बाऊलवर सराव करत आहे. इंग्लंडला वेस्ट इंडिजबरोबर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
उभय संघात हे सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.