लंडन - इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराविरूद्ध लढा देण्यासाठी ६१ मिलियन पौंड म्हणजे ५७१ कोटीचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता, ईसीबीने २८ मे क्रिकेटसंबंधी कार्यक्रमांवर आधीच बंदी घातली होती.
ईसीबीच्या मते, काउन्टी, बोर्ड आणि क्लबमध्ये खेळाच्या सर्व स्तरांवर अर्थसहाय्य दिले जाईल. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, आम्हाला या आव्हानात्मक काळात आमच्या सर्व सदस्यांना जलद आणि त्वरित मदत द्यायची आहे.
-
ECB unveils £61m interim support package for professional and recreational cricket
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) March 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ECB unveils £61m interim support package for professional and recreational cricket
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) March 31, 2020ECB unveils £61m interim support package for professional and recreational cricket
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) March 31, 2020
सुरुवातीला ४ कोटी पौंडची आर्थिक मदत त्वरित देण्यात येईल, जी प्रथम श्रेणी काउन्टी आणि काउन्टी क्रिकेट बोर्डासाठी असेल. उर्वरित रक्कम २०२०-२१ दरम्यान सुविधा मिळण्यास पात्र नसलेल्या काउन्टींना देण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आपली वर्ल्डकप जर्सीचा लिलाव करणार आहे.