लंडन - अॅशेस मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात इग्लंडचा कर्णधार जो रुट ५७ धावांवर बाद झाला. तसेच जॉनी बेयरस्टो २२ धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या संघाने दुपारच्या जेवणानंतर ८६ धावांच्यापुढे खेळ सुरू केला होता. सुरुवातीचा फलंदाज रोरी बर्न्सने ४२ धावा तर रुटने २८ धावा करत खेळ सुरू केला होता.
बर्न्स व रुटची ७६ धावांची भागिदारी -
इग्लंडच्या संघाला दुसरा झटका बर्न्सच्या रुपाने १०३ धावांवर बसला. तो वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या चेंडूवर मार्शने घेतलेल्या झेलमुळे बाद झाला. त्यावेळी बर्न्सने ८७ चेंडूमध्ये ४७ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ७ चौकार लगावले. बर्न्स आणि रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागिदारी केली. यानंतर बेन स्टोक्सही २० धावांवर बाद झाला. स्टोक्सला मार्शने झेलबाद केले. स्टोक्सने ३६ चेंडूत २ चौकार लगावले. रुट आणि स्टोक्स यांनी २७ धावांची भागिदारी केली.
दरम्यान, रुटने आपल्या करिअरमधील ४५ वे अर्धशतक पूर्ण केले. ज्यात त्याने १४१ चेंडूचा सामना करत ३ चौकार लगावले. जो डेनलीने २६ चेंडूत १४ धावा केल्या. ऑस्ट्रलिया संघाकडून पेट कमींस, जोश हेजलवूड आणि मिशेल मार्श ने प्रत्येकी १-१ बाद केले.
धावसंख्या - २६४ धावा ८ बाद, जोस बटलर ५८ धावा, जॅक लीच १० धावा (दोघेही खेळत आहेत)