लंडन - इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि ३ चेंडू राखून पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ६ बाद १४५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. मिचेल मार्श सामनावीर ठरला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली आहे.
-
Australia's win in the third T20I sees them retake top spot in the ICC rankings! #ENGvAUS pic.twitter.com/XTEQawDTB9
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Australia's win in the third T20I sees them retake top spot in the ICC rankings! #ENGvAUS pic.twitter.com/XTEQawDTB9
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2020Australia's win in the third T20I sees them retake top spot in the ICC rankings! #ENGvAUS pic.twitter.com/XTEQawDTB9
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2020
इंग्लंडच्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड आणि कर्णधार अॅरोन फिंच यांनी ३१ धावांची सलामी दिली. मॅथ्यू वेड मार्क वूडच्या गोलंदाजीवर १४ धावांवर बाद झाला. फिंच आणि स्टॉयनीस या जोडीने डाव सावरला. फिंच ३९ धावांवर तर स्टॉयनीस २६ धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामनादेखील गमवावा लागणार असे वाटत होते. पण अष्टपैलू मिचेल मार्श संघासाठी धावून आला. त्याने संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिले. मार्शने ३६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या. मार्शला अॅश्टन अगरने १६ धावा करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४५ धावा केल्या. सलामीवर टॉम बॅन्टन अवघ्या २ धावांवर माघारी परतला. तेव्हा जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलानने डाव सावरला. ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. झम्पाने मलानला स्टोनिसकडे झेल देण्यास भाग पाडले आणि सेट जोडी फोडली. दुसरीकडे बेअरस्टोने शानदार अर्धशतक झळकावले. ५५ धावांवर असताना त्याला अगरने बाद केले. त्यानंतर मोईन अली (२३) आणि जो डेन्टली (नाबाद २९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडला १४५ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याची मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. जोस बटलरला मालिकावीर घोषित करण्यात आले. उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. खेळाडू या मालिकेनंतर आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी युएईकडे रवाना होतील.