ETV Bharat / sports

ENGvAUS : अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दोन धावांनी विजय - इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी-२० सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात यजमान इंग्लंड संघाने अटीतटीच्या लढतीत २ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.

ENG vs AUS 1st T20 : England wins by 2 runs in last ball thriller
ENGvAUS: अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दोन धावांनी विजय
author img

By

Published : Sep 5, 2020, 12:10 PM IST

लंडन - ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात यजमान इंग्लंड संघाने अटीतटीच्या लढतीत २ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने डेव्हिड मलानच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ७ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला. मलान सामनावीर ठरला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो या सलामीवीर जोडीने ३.५ षटकांत ४३ धावा केल्या. बेअरस्टो (८) कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या डेव्हिड मलानने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. मलानसोबत बटलरनेही वेगाने धावा केल्या. जोस बटलरला अगरने कमिन्सकरवी झेलबाद केले. बटलरने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. बटलर पाठोपाठ टॉम बॅन्टन, कर्णधार इयॉन मार्गन आणि मोईन अली ठराविक अंतराने बाद झाले. पण दुसरीकडे मलानने एक बाजू पकडून ठेवत अर्धशतक झळकावले. ४३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने मलानने ६६ धावा केल्या. रिचर्डसनने त्याला स्टिव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. २० षटकांत इंग्लंडने ७ बाद १६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅश्टन अ‍ॅगर, केन रिचर्डसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २-२ तर पॅट कमिन्सने एक बळी घेतला.

इंग्लंडचे १६३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सुरुवात दणकेबाज झाली. सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच यांनी पहिल्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. ही जोडीच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना ऑर्चरने फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंचने ३२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ४६ धावा केल्या.

फिंच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल हे महत्वाचे फलंदाज फारशी छाप पाडू शकले नाहीत. यादरम्यान वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले. ५८ धावांवर असताना त्याचा अडथळा जोफ्रा ऑर्चरने दूर केला. मधल्या फळीत स्टॉयनिसने नाबाद २३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. अखेर इंग्लंडने २ धावांनी बाजी मारली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी २-२ तर मार्क वूडने एक बळी घेतला.

हेही वाचा - आयपीएल २०२० च्या वेळापत्रकाबाबत सौरव गांगुली म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.