ETV Bharat / sports

IPL 2020, KKR vs MI : विजयी सुरूवात करण्यास केकेआर उत्सुक; पुनरागमनासाठी मुंबई सज्ज - केकेआर वि. एमआय सामना हायलाइट्स

आज आबुधाबीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.

Dream11 IPL 2020, Match 5: KKR vs MI - Preview
IPL 2020, KKR vs MI : विजयी सुरूवात करण्यास केकेआर उत्सुक; पुनरागमनासाठी मुंबई सज्ज
author img

By

Published : Sep 23, 2020, 3:25 PM IST

आबुधाबी - गतविजेत्या मुंबई इंडियन्सला या वर्षी आयपीएलच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव सहन करावा लागला. 2013 सालापासून त्यांना पहिल्या लढतीत विजय मिळवता आलेला नाही, पण आता हा पराभव मागे टाकून रोहित सेना आज होणाऱ्या लढतीत झोकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्ससमोर दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ पहिल्याच लढतीत विजय मिळवून आत्मविश्वास कमविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, यात शंका नाही.

मुंबई इंडियन्सने चार वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे केकेआरचा संघ दोन वेळा विजेता ठरला आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या हंगामाचे जेतेपद मिळविले. तर केकेआर २०१२, २०१४ या हंगामाचा विजेता ठरला.

आजच्या सामन्यात केकेआरचा संघ मुंबई इंडियन्सच्या तोडीचा आहे. केकेआरच्या डावाची सुरूवात शुभमन गिल आणि सुनिल नरेन करतील. त्यानंतर इयॉन मॉर्गन, कर्णधार दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, नितेश राणा यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स, कुलदीप यादव, कमलेश नागरकोट्टी यांच्यासह सुनिल नरेन आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघात नामांकित खेळाडूंचा भरणा आहे. यात क्विंटन डी क्वाक, कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट ही नावे घेता येतील.

मुंबईच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर आहे. चेन्नईविरुद्ध रोहित १२ धावांतच माघारी परतला. तेथूनच मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. त्याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने मुंबईसाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे.

कोलकाता संघात अनेक फिरकीपटूंचा भरणा असल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबईचे फलंदाज कशी फलंदाजी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. त्यामुळे आजच्या होणाऱ्या कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरेल. या सामन्याला अबुधाबी येथे रात्री 7.30 वाजल्यापासून सुरूवात होईल.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृनाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रित बुमराह.

केकेआरचा संभाव्य संघ -

सुनिल नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयोन मॉर्गन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, पॅट कमिंन्स, कुलदीप यादव.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.