दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नईचे ११ सामन्यांपैकी आठ पराभवांमुळे आधीच संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे बंगळुरू आजचा सामना जिंकून प्ले ऑफची दावेदारी भक्कम करण्यासाठी इच्छुक आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढील सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यांनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने युवा ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदीशन यांना संधी दिली, परंतु दोघांनीही घोर निराशा केली. पण सॅम करनने संकटात अर्धशतक झळकावत संघाला तारलं होतं.
दुसरीकडे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने १४ गुणांसह बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले असले तरी आणखी एका विजयासह ते पक्के होऊ शकेल. एबी डिव्हिलियर्सकडे सामन्याचे चित्र एकहाती पालटण्याची क्षमता आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टिच्चून गोलंदाजी करीत कोलकाताच्या नाकी नऊ आणले होते. देवदत्त पडिक्कल सातत्याने धावा करीत आहे. विराट देखील फार्मात आहे. ख्रिस मॉरिस अष्टपैलू कामगिरी करत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मुरली विजय, अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रविंद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिशेल सँटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.