ETV Bharat / sports

MI vs RR : बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सची अग्निपरीक्षा

author img

By

Published : Oct 6, 2020, 6:44 AM IST

आयपीएल २०२० मध्ये आज राजस्थान रॉयल्सपुढे सुसाट फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचे खडतर आव्हान आहे.

DREAM11 IPL 2020, MATCH 20: MI VS RR - PREVIEW
MI vs RR : बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सची अग्निपरीक्षा

अबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये आज राजस्थान रॉयल्सपुढे सुसाट फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचे खडतर आव्हान आहे. मागील दोन सामन्यातील पराभवातून धडा घेत राजस्थान विजय मिळण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर दुसरीकडे मुंबई आणखी दोन गुणांसह गुणतालिकेचे अव्वलस्थान काबीज करण्यासाठी उत्सुक आहे.

मुंबईचा संघ संपूर्ण लयमध्ये आहे. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव वरच्या फळीत फलंदाजीची कमान चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. मागील सामन्यात क्विंटन डी कॉकला सूर गवसला आहे. तर हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्या मोक्याच्या षटकार-चौकाराचा पाऊस पाडत वेगाने धावा जमवत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन ही तिकडी टिच्चून मारा करत आहे. यामुळे मुंबईचा संघ आजच्या सामन्यात वरचढ आहे.

दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन हे देखील सातत्याने धावा करत आहेत. पण त्याचा दुसरा सलामीवीर जोस बटलरला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. मधली फळी राजस्थानसाठी चिंतेचा विषय ठरलेली आहे. राहुल तेवतियासारख्या फलंदाजामुळे राजस्थानची काही अंशी चिंता मिटली आहे. बेन स्टोक्स जरी युएईमध्ये दाखल झालेला असला तरी तो या सामन्यात खेळू शकणार नाही. कारण त्याचा क्वारंटाइनचा अवधी अद्याप पूर्ण झालेला नाही. गोलंदाजीमध्ये उनाडकट पॉवर प्ले किंवा डेथ ओव्हर्समध्ये अपयशी ठरत आहे. त्यामुळे टॉम करन व जोफ्रा आर्चर यांच्यावर दबाव येत आहे. यामुळे स्मिथ वरुण अ‍ॅरोन किंवा कार्तिक त्यागीला संधी देऊ शकतो.

  • मुंबई इंडियन्सचा संघ -
  • रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पँटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅक्लीनागन, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.
  • राजस्थान रॉयल्सचा संघ -
  • जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयांक मारकंडे, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.