ETV Bharat / sports

IPL २०२० : हॅट्ट्रिक कोणाची? दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची - दिल्ली कॅपिटल्स न्यूज

आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.

DREAM11 IPL 2020, MATCH 11 : DC VS SRH PREVIEW
IPL २०२० : दिल्लीचे विजयी हॅट्ट्रिकचे लक्ष्य; हैदराबाद विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील
author img

By

Published : Sep 29, 2020, 6:48 AM IST

Updated : Sep 29, 2020, 10:05 AM IST

आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात युवा खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघ अजेय असून त्यांनी पहिले दोन सामने जिंकत गुणातालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांचा आज सनरायजर्स हैदराबादशी सामना होणार आहे. हैदराबादचा संघ आपले दोन्ही सामने गमावल्याने, गुणातालिकेत तळाला आहे. आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी सातत्य कायम राखण्याचे ध्येय दिल्ली कॅपिटल्सचे असणार आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ विजयासह पुनरागमन करण्यास प्रयत्नशील आहे.

आजच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असणार आहे. महत्वाचे म्हणजे हे खेळाडू उपयुक्त खेळी करत दिल्लीच्या विजयात योगदान देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे तसेच शिमरॉन हेटमेयरच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली असल्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा, ऑनरिख नॉर्किआ तसेच फिरकीपटू अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

दुसरीकडे मधली फळी हैदराबादसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी दमदार कामगिरी करूनही मधल्या फळीच्या अपयशामुळे हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवता आला नाही. वृद्धिमान साहा अपयशी ठरत असून त्याच्याकडून आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून मॅच विनिंग खेळीची आपेक्षा हैदराबादची असेल. मागील सामन्यात मिचेल मार्शच्या जागी निवड झालेल्या मोहम्मद नबीने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. याशिवाय हैदराबादला आता केन विल्यम्सनला संधी देण्याबाबत विचार करावा लागणार आहे. गोलंदाजीत फिरकीपटू रशिद खानकडून मोठ्या अपेक्षा असून अन्य गोलंदाजांनाही आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

MI vs RCB : सुपर ओव्हरमध्ये विराटसेनेची रोहितच्या मुंबई इंडियन्सवर मात

''सॅमसन नावाचा गृहस्थ खातो तरी काय?'', आनंद महिंद्रांना पडला प्रश्न

Last Updated : Sep 29, 2020, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.