ETV Bharat / sports

यंदाच्या आयपीएलला मिळाला नवा प्रायोजक, २२२ कोटींची बोली लावून 'या' कंपनीची बाजी - Dream 11 wins ipl 2020 title sponsorship

ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनअ‌ॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते.

Dream 11 wins ipl 2020  title sponsorship for rs 222 crores
यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या मिळाला नवा प्रायोजक
author img

By

Published : Aug 18, 2020, 2:56 PM IST

Updated : Aug 18, 2020, 3:09 PM IST

नवी दिल्ली - यंदा यूएईत होणाऱ्या आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला आहे. ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. प्रायोजकत्वासाठी ड्रीम ११ ने २२२ कोटी रूपये मोजले असल्याचे वृत्त आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिले. मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनअ‌ॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हे देखील होते. अनअ‌ॅकॅडमीने २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली.

जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते. त्यानंतर, प्रायोजक म्हणून आयपीएलने विवोला कायम ठेवल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध नोंदवला. या निषेधानंतर, विवोने प्रायोजकत्वातून माघार घेतल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मुख्य प्रायोजक म्हणून पतंजलीचेही नाव समोर आले होते.

  • Dream11 wins IPL 2020 title sponsorship for Rs 222 crores: IPL Chairman Brijesh Patel

    — ANI (@ANI) August 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विवोने २०१८ मध्ये २१९९ कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना ‘बीसीसीआय’ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी, ही त्यातली प्रमुख अट होती. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल यूएईमध्ये खेळली जाईल.

Last Updated : Aug 18, 2020, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.