ETV Bharat / sports

KXIP vs RCB : पंजाबसमोर बंगळुरूचे बलाढ्य आव्हान, किंग्जला विजयाची नितांत गरज

author img

By

Published : Oct 15, 2020, 3:18 PM IST

आयपीएल २०२० मध्ये आज रॉयल चॅलेंजर बंगळुरूसमोर गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या क्रमांकावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान आहे.

DREAM 11 IPL 2020 MATCH 31 : RCB VS KXIP PREVIEW
KXIP vs RCB : पंजाबसमोर बंगळुरूचे बलाढ्य आव्हान, किंग्जला विजयाची गरज

शारजाह - आयपीएल २०२० मध्ये आज रॉयल चॅलेंजर बंगळुरूसमोर गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या क्रमांकावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान आहे. पंजाबला तेराव्या हंगामात अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यात तब्बल ६ सामने पंजाबने गमावले आहेत. आजच्या सामन्यातून ते विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील असून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना विजयाची नितांत गरज आहे. तर दुसरीकडे विराटच्या नेतृत्वात बंगळुरूचा संघ सुसाट फार्मात आहे.

बंगळुरूविरूद्धच्या आजच्या सामन्यात पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला संधी मिळू शकते. शारजाहचे छोटे मैदान ख्रिस गेलसारख्या 'सिक्सर किंग'साठी आदर्श ठरू शकते. पंजाबची फलंदाजी बहारात आहे. केएल राहुल, मयांक अग्रवाल सातत्याने धावा करत आहेत. पण त्यांच्यासाठी गोलंदाजी हा डोकेदुखीचा वियष ठरला आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई वगळता इतर गोलंदाज विशेष करून डेथ ओव्हरमध्ये प्रभावी ठरलेले नाहीत.

दुसरीकडे बंगळुरूचे देवदत्त पडीक्कल, अ‌ॅरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली हे चौघे चांगली कामगिरी करत आहेत. डिव्हिलियर्सने तर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७३ धावांची खेळी साकारली होती. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर हुकमी एक्के ठरले आहेत. नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शिवम दुबे यासह इसुरू उदानाही डेथ ओव्हरमध्ये प्रभावी मारा करत आहे. ख्रिस मॉरिस संघात परतल्याने बंगळुरूचा संघ अधिक मजबूत झाला आहे.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
  • विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अ‌ॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदास पडीक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वाशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अ‌ॅडम झम्पा.
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
  • केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बराड, इशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स नीशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरण, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन आणि सिमरन सिंह.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.