दुबई - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईचे ७ पैकी ५ सामने गमावले आहेत. स्पर्धेतील स्थान राखायचे असेल तर चेन्नईला आज सनराजझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करावे लागेल. दुसरीकडे सनराजझर्संनाही आपले आव्हान मजबूत करण्यासाठी विजय मिळवावा लागणार आहे. कारण सनरायजर्संनी सातपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवला आहे.
चेन्नईच्या शेन वॉटसन व फाफ डू प्लेसिस या सलामीवीर जोडीने चांगली कामगिरी केली आहे. पण मधल्या फळीत धोनीसह अंबाटी रायुडू, रवींद्र जडेजा यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. केदार जाधवच्या जागी मागील सामन्यात एन. जगदीशनला स्थान देण्यात आले होते. परंतु तोही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. आजच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमाचे कोडे सोडवणे, हेच धोनीपुढील प्रमुख आव्हान असणार आहे. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर प्रभावी ठरले आहेत. शिवाय फिरकीपटू कर्ण शर्माने पियुष चावलाच्या अनुपस्थितीत उत्तम गोलंदाजी केली आहे. जडेजाही मोक्याच्या क्षणी विकेट घेत आहे. सॅम करन अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोखपणे बजावत आहे.
दुसरीकडे हैदराबादचे खेळाडू जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन सातत्याने चांगल्या धावा करत आहेत. पण युवा प्रियम गर्ग आणि अब्दुल समद या युवांवर अवलंबून राहणे हैदराबादला महागात पडू शकते. शिवाय राजस्थानविरुद्धच्या पराभवामुळे हैदराबादच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. संदीप शर्मा, खलील अहमद व युवा अभिषेक शर्मा गोलंदाजीमध्ये अपयशी ठरले आहे. फिरकीपटू रशिद खान हैदराबादचा हुकमी एक्का असून पुन्हा एकदा त्याच्यावरच हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त असेल.
- चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाटची रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
- सनरायझर्स हैदराबादचा संघ -
- डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.