ETV Bharat / sports

निवृत्ती की पुनरागमन..! महेंद्रसिंह धोनी म्हणाला... - धोनी विषयी बातम्या

निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आता त्याने याविषयी एका कार्यक्रमात जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका असं सांगितलं आहे.

do not ask till january quashes ms dhoni after reports of retirement
निवृत्ती की पुनरागमन...! महेंद्रसिंह धोनी म्हणाला....
author img

By

Published : Nov 28, 2019, 1:23 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर क्रिकेटपासून लांब आहे. तो विश्वकरंडकानंतर निवृत्ती घेणार अशा चर्चां रंगल्या होत्या. मात्र, त्याने निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आता त्याने याविषयी एका कार्यक्रमात जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका, असे सांगितले आहे.

धोनीने विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेनंतर तीन देशांविरुध्द मालिका खेळल्या. या तिन्ही देशाविरुध्द भारतीय संघात धोनीचा समावेश नव्हता. धोनीने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्दच्या मालिकांमधून माघार घेतली होती.

धोनीला बुधवारी संघात कधी परतणार? असे विचारले असता, धोनीने जानेवारीपर्यंत काही विचारू नका असे उत्तर दिले. यामुळे धोनी जानेवारीपर्यंत भारतीय संघात दिसणार नाही. हे मात्र पक्के झाले आहे.

काही दिवसांपूर्वी धोनी झारखंडच्या २३ वर्षाखालील संघाबरोबर सराव करताना दिसला होता. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाविषयी चर्चा सुरू होती. मात्र, तो आता जानेवरीपर्यंत मैदानात परतणार नाही. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली टी-२० विश्व करंडक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला आहे.

हेही वाचा - मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश

हेही वाचा - भारताविरूद्धच्या दौऱ्यातून विडींजच्या 'या' स्फोटक खेळाडूने घेतली माघार

हेही वाचा - IND VS WI : दुखापतीमुळे शिखर धवन संघातून आऊट, 'या' खेळाडूला संधी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.