ETV Bharat / sports

'कोण है रे ये? कहा से पकड लाते है', गांगुली जेव्हा भरमैदानात 'या' खेळाडूवर भडकतो

दिनेश कार्तिकने प्रसिद्ध निवेदक गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात गांगुलीसोबतचा 'तो' किस्सा सांगितला. २०१४ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मी संघाचा भाग होतो. त्यावेळी मला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. मात्र मी राखीव खेळाडू असल्याने इतरांसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जात असे. तेव्हा मैदानात जात असताना मी अचानक सौरव गांगुलीच्या अंगावर जाऊन धडकलो. त्यावेळी आधीच संतापलेल्या गांगुलीने माझ्याकडे पाहून, कोण आहे हा ? कुठून आणता असल्या खेळाडूंना इथे ? असे वक्तव्य केले. ही आठवण दिनेशने सांगितली.

सौरव गांगुली
author img

By

Published : Sep 24, 2019, 9:36 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची ख्याती जगभरात आक्रमक खेळाडू म्हणून आहे. याच आक्रमकतेच्या जोरावर गांगुलीने भारतीय संघाला परदेशात खेळायला शिकवले. अनेक वेळा तर गांगुली भरमैदानातच भडकलेला दिसून आला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकलाही गांगुलीच्या रागाचा सामना करावा लागला आहे. कार्तिकने खुद्द यांची कबुली दिली आहे.

हेही वाचा - विराटला आली धोनीची आठवण, 'या'साठी रोहित शर्माकडे मागितली मदत

दिनेश कार्तिकने प्रसिद्ध निवेदक गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात गांगुलीसोबतचा 'तो' किस्सा सांगितला. २०१४ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मी संघाचा भाग होतो. त्यावेळी मला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. मात्र मी राखीव खेळाडू असल्याने इतरांसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जात असे. तेव्हा मैदानात जात असताना मी अचानक सौरव गांगुलीच्या अंगावर जाऊन धडकलो. त्यावेळी आधीच संतापलेल्या गांगुलीने माझ्याकडे पाहून, कोण आहे हा ? कुठून आणता असल्या खेळाडूंना इथे ? असे वक्तव्य केले. ही आठवण दिनेशने सांगितली.

हेही वाचा - 'बुमराहचा आउटस्विंग फलंदाजांसाठी कर्दनकाळ, तर सैनीमध्ये कसोटी खेळण्याची क्षमता'

यावर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने दिनेश कार्तिकला ट्रोल केले आहे. दरम्यान, हा सामना भारत विरुध्द पाकिस्तान संघामध्ये झाला होता. दोन्ही संघाना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक होता. तेव्हा भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २०० धावा केल्या होत्या. मात्र, पाकिस्तानने हे लक्ष्य ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने नाबाद ८१ धावांची खेळी केली होती. तर सौरव गांगुली आणि युवराज सिंह यांना या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.