कोलकाता - बीसीसीआयने सोमवारी विश्वकरंडक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. संघात निवड झाल्यानंतर कार्तिक म्हणाला, विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान मिळने म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.
भारतीय संघामध्ये युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. कार्तिकने सोमवारी रात्री आयपीएलमधील आपली टीम कोलकाता नाइट राइडर्सच्या वेबसाइटवर सांगितले की, माझी संघात निवड झाल्यानंतर मी खूप उत्साहीत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनचे विश्वकरंडकात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे तो म्हणाला. कार्तिकने भारतासाठी आजवर ९१ वनडे सामने खेळले आहेत.
निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी कार्तिकच्या निवडीवर सांगितले की, पंत ऐवजी कार्तिक हाच चांगला पर्याय वाटला. जेव्हा महेंद्र सिंह धोनी संघात नसेल तेव्हा संघाला वाईट परिस्थितीतून शांतपणे बाहेर काढण्यासाठी अनुभवी खेळाडू संघात असणे गरजे आहे. त्यामुळेच कार्तिकला झुकते माप देण्यात आले आहे.