ETV Bharat / sports

IPL २०२१: धोनीला दुहेरी धक्का; सामना तर गमावलाच सोबत झाला दंडही

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'स्लो-ओव्हर रेट'चा ठपका चेन्नई सुपर किंग्ज संघावर ठेवण्यात आला आहे.

IPL 2021: dhoni-to-pay-rs-12-lakh-for-maintaining-slow-over-rate-against-dc
IPL २०२१: धोनीला दुहेरी धक्का; सामना तर गमावलाच सोबत झाला दंडही
author img

By

Published : Apr 11, 2021, 12:18 PM IST

Updated : Apr 11, 2021, 12:43 PM IST

मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना तर गमावलाच त्यासोबत त्यांना दंड देखील भरावा लागला आहे. आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलने चेन्नईला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'स्लो-ओव्हर रेट'चा ठपका चेन्नई सुपर किंग्ज संघावर ठेवण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार एका तासात एका डावात किमान १४.१ षटकांचा खेळ होणे बंधनकारक आहे. चेन्नईच्या संघाने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात फक्त १८.४ षटकेच फेकली. दिल्लीने १९ व्या षटकातच चेन्नईने दिलेले लक्ष्य गाठले होते. पण चेन्नईने षटके पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने आयपीएलकडून दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, चेन्नईची या हंगामातील ही पहिलीच चूक असल्याने त्यांना केवळ १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंडाची रक्कम २४ लाख, तर तिसऱ्या वेळेस ३० लाखांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. इतकेच नव्हे तर एका सामन्याची बंदी देखील येऊ शकते.

दिल्लीने असा जिंकला सामना -

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा सुरेश रैनाचे अर्धशतक आणि सॅम कुरेनच्या झटपट धावांमुळे चेन्नईने दिल्लीसमोर २० षटकात ७ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर ७ गड्यांनी सहज मात दिली. सामन्यात ८५ धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हेही वाचा - IPL २०२१ : कोलकाता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोणत्या ४ विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरणार

हेही वाचा - IPL 2021 LIVE CSK vs DC : धोनी सेनेचा पराभव; दिल्लीने मिळवला सात विकेट्सनी विजय

Last Updated : Apr 11, 2021, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.