मुंबई - बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या वार्षिक करारातून वगळलं आहे. धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकानंतर संघाबाहेर आहे. आता तर बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टरमधूनही धोनीला बाहेर केलं आहे. दरम्यान, धोनीला पोस्टरमधून बाहेर केल्याने, त्याच्या चाहत्यांनी बीसीसीआयला १३ मिलियनवरुन ३ मिलियन करु, अशी धमकी दिली आहे.
इंन्स्टाग्राम अकाउंटवर, भारतीय संघाचे १३ मिलियन (१ करोड ३० लाख) फॉलोअर्स झाले आहेत. यामुळे बीसीसीआयने, फॉलोअर्संचे आभार मानण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये महिला आणि पुरुष खेळाडू दिसून येत आहेत. पण यात धोनी नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बीसीसीआयच्या पोस्टर फोटोत संघाचा कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर तर महिलांमध्ये हरमनप्रीत कौर, उप-कर्णधार स्मृती मानधाना, पूनम यादव यांचा समावेश आहे.
बीसीसीआयने हा फोटो शेअर करताना, १३ मिलियन लोकांचा मजबूत परिवार..! तुमचे प्रेम आणि समर्थनासाठी आभार, असे म्हटलं आहे.
यात धोनीचा फोटो नसल्याने, धोनीचे चाहते चिडले असून त्यांनी बीसीसीआयला धारेवर धरले आहे. त्यांनी बीसीसीआयला १३ मिलियनवरुन ३ मिलियन करु, असे धमकावलं आहे.
![dhoni out of bcci official indian cricket team instagram account virat kohli rohit sharma kl rahul in with harmanpreet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6507340_kkkkk.jpg)
दरम्यान, धोनीची संघात वापसी कठीण असल्याचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनी याआधी म्हटलं आहे. धोनीला आयपीएलच्या रुपाने संघात पुनरागमनाची संधी होती. पण आयपीएलवर कोरोना विषाणूचे सावट आहे. यामुळे ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
हेही वाचा - VIDEO : मोदींच्या 'जनता कर्फ्यू'ला धोनीसह चेन्नईच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून दिला प्रतिसाद
हेही वाचा - पाकिस्तानी खेळाडूला कोरोनाची भीती; घातले 'श्रीरामा'स साकडे..!