नवी दिल्ली - दुसर्या टी-२० सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला चार गडी राखून नमवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. डेव्हिड मलानने (५५) अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बोलँड पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून १४६ धावा केल्या. एक चेंडू आणि सहा गडी राखून इंग्लंडने हे आव्हान पूर्ण केले.
हेही वाचा - ''मला विराट कोहलीचे नेतृत्त्व समजत नाही''
आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने जेसन रॉयला (१४) लवकर गमावले. यानंतर, जोस बटलरही (२२) देखील माघारी परतला. जॉनी बेअरस्टोला केवळ तीन धावा करता आल्या. त्यानंतर मलानला बेन स्टोक्स (१६) आणि कर्णधार इयान मॉर्गनची साथ लाभली. इंग्लंडच्या १३४ धावा झाल्या असताना लुंगी एनगिडीने मलानला बाद केले. कर्णधार मॉर्गनने नाबाद २६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार क्विंटन डी कॉकने संघासाठी सर्वाधिक ३० धावा केल्या. जॉर्ज लिंडेने २९, रसी व्हॅन डर डुसेनने २५ धावा केल्या.