ETV Bharat / sports

IPL : यंदाची 'ऑरेंज कॅप' डेव्हिड वॉर्नरकडे.. - Indian Premier League

वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात १२ सामने खेळताना ६९२ धावा केल्या आहेत

डेव्हिड वॉर्नर
author img

By

Published : May 11, 2019, 7:52 PM IST

मुंबई - सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर आयपीएलच्या मागच्या मोसमात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो २०१८ च्या आयपीएलला मुकला होता. मात्र या वर्षात वॉर्नरने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो.

वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात १२ सामने खेळताना १ शतक व ८ अर्धशतकांसह ६९.२० सरासरीने ६९२ धावा केल्या आहेत. ६०० पेक्षा जास्त धावा करणारा वॉर्नर हा या मोसमातील एकमेव खेळाडू आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वॉर्नरच्या आसपास कोणताच खेळाडू नसल्याने आयपीएलच्या या मोसमाची ऑरेंज कॅप ही वॉर्नरकडेच राहणार आहे.

या मोसामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादित पंजाबचा लोकेश राहुल ५९३ धावांसह दुसऱ्या, दिल्लीचा शिखर धवन ५२१ धावांसह दुसऱ्या तर कोलकाताचा आंद्रे रसेल ५१० धावासंह तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र या तिन्ही खेळाडूंच्या संघाचे आयपीएलमधील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले असल्याने यंदाची 'ऑरेंज कॅप' ही डेव्हिड वॉर्नरकडेच राहणार आहे.

मागील काही वर्षातील वॉर्नरने आयपीएलमध्ये काढलेल्या धावा

वर्ष धावा

  • २०१४ - ५२८
  • २०१५ - ५६२
  • २०१६ - ८४८
  • २०१७ - ६४१
  • २०१९ - ६९२

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.